Home जालना धक्कादायक! २१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळले अन….

धक्कादायक! २१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळले अन….

Breaking News | Jalna Crime: एका 21 वर्षांच्या तरुणाला जिवंत जाळल्याची माहिती मिळाली, मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला.

A 21-year-old man was burnt alive

जालना: जालन्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षांच्या तरुणाला जिवंत जाळल्याची माहिती मिळाली आहे. जालनामधल्या बदनापूर तालुक्यात असलेल्या मेहुना गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकाश जाधव असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आकाशचा मृतदेह गावातल्या गायरान जमिनीमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळला. पण या तरुणाला कोणत्या कारणामुळे जाळलं ? कोणी जाळलं ? या प्रश्नांची उत्तरे मात्र अद्याप मिळालेली नाहीत. या घटनेविषयीची माहिती मिळाल्यानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आकाशला आलेल्या फोन कॉल्सवरुन माहिती गोळा केली जात आहे. आकाशच्या नातेवाईकांची आणि आसपास राहणाऱ्या लोकांची चौकशी होणार का ? तसेच या चौकशीतून हत्या करणाऱ्याचा तपास

या घटनेमधील आरोपीला शोधून त्याला पकडून योग्य कारवाई करण्याची मागणी मृत आकाश जाधवच्या नातेवाईकांनी केली आहे. आकाशची हत्या करण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: A 21-year-old man was burnt alive

See also: Latest Marathi News Breaking News liveSangamner NewsAhmednagar NewsAj Smart News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here