संगमनेर: १७ वर्षीय युवकाचा मुळानदीत बुडून मृत्यू
Breaking News | Sangamner: जांबुत केटीवेअर येथे अंघोळीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील मुळा नदीवरील जांबुत केटीवेअर येथे अंघोळीसाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वार – गुरूवार दि २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडलीय. अजय भाऊसाहेब काळे (वय १७) रा. जांबुत, ता. संगमनेर असे मयत युवकाचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, मुळा नदीवरील जांबुत केटीवेअर या ठिकाणी अजय काळे हा युवक अंघोळीसाठी गुरूवारी दुपारी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Web Title: A 17-year-old youth drowned in the river
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study