संगमनेर: मुळा नदीच्या पात्रात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Ahmednagar | Sangamner News: मुळा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरातील माळदवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. मुळा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. . तुशिल रोहिदास दुधवडे (रा. माळवदवाडी खंदरमाळ, ता. संगमनेर) असे मयत मुलाचे नाव आहे.
मुळा नदीच्या पात्रात तासाचा डोह या ठिकाणी पोहायला गेलेला तुशिल हा पाण्याच्या भोवऱ्यात बुडाला. त्याचे चुलते बबन जानकू दुधवडे (रा. माळवदवाडी खंदरमाळ, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक बी. वाय. गोडे अधिक तपास करीत आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
Web Title: A 15-year-old boy drowned in the Mula River
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App