Home संगमनेर संगमनेर: संस्थेची बनावट कागदपत्रे बनवून दिशाभूल प्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेर: संस्थेची बनावट कागदपत्रे बनवून दिशाभूल प्रकरणी गुन्हा दाखल

Sangamner misleading the organization by making fake documents

संगमनेर | Sangamner: स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या हेतूने संस्थेचे कधीही सभासद नसलेल्या व्यक्तींनी संस्थेची बनावट कागदपत्रे व ठराव तयार करण्यात आले. अहमदनगर येथील सहायक धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केल्याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नजीर इस्माईल तांबोळी वय ५३ रा. वडगाव पान ता. संगमनेर यांनी फिर्याद दाखल केली असून यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आलाईड एजुकेशन सोसायटी या संस्थेची बनावट कागदपत्रे व ठराव गुन्हा दाखल झालेल्या चार जणांनी धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केली आहे. सदर प्रकार हा त्यांनी त्याचा स्वतः च्या आर्थिक फायद्याच्या दृष्टीने केला आहे.   

शेख रइस अहमद, जावेद शेख लाल रा. कोल्हेवाडी रोड संगमनेर, महमंद जावेद हुसेन रा. पुणे, शबाना रईस बेपारी रा. कोल्हेवाडी रोड संगमनेर अशी चार गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संगमनेर पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे तपास करीत आहेत.

Web Title: Sangamner misleading the organization by making fake documents

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here