अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष वाघ लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
अकोले | Akole: अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष वाघ हा नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना आज घडली आहे.
त्याला पथकाने पैशासह ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. संगमनेर तालुक्यातील पोलीस नाईक रंगेहाथ पकडण्याची घटना ताजी असतानाच आज अकोले तालुक्यात पोलीस नाईक रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्यांचा जमिनीबाबत परस्परविरोधी वाद सुरु होता. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. या वादातून लवकरात लवकर मार्ग निघावा यासाठी पोलीस नाईक संतोष वाघ हे मध्यस्थी करत होते. पोलीस नाईक याने शेतकऱ्याची गरज ओळखता या संधीचा फायदा करून घेण्यासाठी सदर शेतकऱ्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्याचे आज ठरले होते. या शेतकऱ्याने नाशिकच्या लाचलुचपत प्रबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज पोलिसांनी सापळा रचत पोलीस नाईक संतोष वाघ यास १० हजार रुपयांची लाच स्वीकरताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Web Title: Akole police Santosh Wagh was caught red-handed