Home श्रीगोंदा मोटारसायकलच्या समोरसमोर अपघातात नवविवाहिता ठार

मोटारसायकलच्या समोरसमोर अपघातात नवविवाहिता ठार

Shrigonda newlyweds were killed in an accident

मोटारसायकलच्या समोरसमोर अपघातात नवविवाहिता ठार

श्रीगोंदा | Shrigonda: नगर सोलापूर महामार्गावर दोन मोटारसायकल यांच्यात सामोरासमोर धडक झाल्याने या अपघातात नवविवाहिता ठार झाली तर तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात नगर सोलापूर महामार्गावर बनपिंपरी शिवारात घडला.

नगर सोलापूर महामार्गावर दोन मोटार सायकल यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने मोटारसायकलवरील अंकिता प्रशांत वाल्हेकर वय २२ रा. थिटे सांगवी ही जागीच ठार झाली आहे. तर प्रशांत वाल्हेकर हा जखमी झाला आहे.

प्रशांत वाल्हेकर यांच्या मोटारसायकलला रात्रीच्या सुमारास समोरच्या मोटारसायकलने चुकीच्या बाजूने येऊन धडक दिली. अंकिता व प्रशांत यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झालेले होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.  

Web Title: Shrigonda newlyweds were killed in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here