Home संगमनेर संगमनेरमध्ये संजीवनी हॉस्पिटलची तोडफोड करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण

संगमनेरमध्ये संजीवनी हॉस्पिटलची तोडफोड करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण

Sangamner Demolition of Sanjeevani Hospital

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

रुग्णाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालयात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचार बिल भरण्याच्या वादातून तोडफोड व मारहाण करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका करोनाबाधीताचा मंगळवारी मृत्यू झाला. त्या रुग्णाची सर्व माहिती देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिल भरण्यास सांगितले. रुग्णाचा कृत्रिम श्वास यंत्र बंद का केले असा प्रश्न उपस्थित करून नातेवाईक यांनी हॉस्पिटलची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर डॉ. जगदीश वाबळे व डॉ. स्वप्निल भालके यांना मारहाण केली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डॉ. स्वप्निल भालके व समीरलाल शेख यांनी यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून शहर पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Demolition of Sanjeevani Hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here