Home अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी अनिल कटके यांच्याकडे

जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी अनिल कटके यांच्याकडे

Anil Katke is in charge of District Local Crime Branch

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेच्या पदावर अनिल कटके(Anil Katke) यांची नियुक्ती केली आहे.

सदर आदेश जाहीर झाल्यानंतर त्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस दलात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाबाबत काही दिवसांपासून उधाण आले होते. पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी या पदावर वर्णी लागण्यासाठी मोठी तयारी केली होती. जिल्ह्यातील बऱ्याच पोलीस निरीक्षकांनी या पदावर दावा दाखविला होता.  

Web Title: Anil Katke is in charge of District Local Crime Branch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here