Home क्राईम चोरट्यांनी बँक ग्राहक सेवा केंद्र चालकास रस्त्यात लुटले

चोरट्यांनी बँक ग्राहक सेवा केंद्र चालकास रस्त्यात लुटले

Shrirampur theft on road 

श्रीरामपूर | Shrirampur: जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भरदिवसा चोरटे लुट करून फरार होत आहे. या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

श्रीरामपूर येथील एका बँक ग्राहक सेवा केंद्र चालकास लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन लुटेरे फरार झाले आहे.

याप्रकरणी संजय साखरे वय ३० यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साखरे हे आपल्या मोटारसायकलवरून  धनगरवाडीकडे आज असताना चितळी धनगरवाडी रोडवरील रेल्वे भुयारी पुलाखाली तीन अज्ञात चोरटे आले आणि त्यांना अडविले. साखरे यांच्यावर दमदाटी करत त्यांच्याजवळील ३५ हजार रुपये व एक मोबाईल फोन घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी साखरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस याप्रकरणी चोरट्यांचा शोध घेत आहेत. या रस्त्यावरील लुटीच्या प्रकरणामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shrirampur theft on the road 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here