लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, उपनिरीक्षकावर गुन्हा
चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबार येथील तरुणीचे लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेवासा येथील उपनिरीक्षकासह तीन जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे येथील एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नेवासा पोलीस स्टेशनमधील पोलीस उप निरीक्षक समाधान वसंत भाटेबाल याने चाळीसगाव व नाशिकमध्ये २०१८ ते २०१९ या दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल, अरुण वसंत भाटेवाल, वसंत भाटेवाल रा. नेवासा पप्पू कुमावत रा. चाळीस गाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Torture of a young woman by showing the lure of marriage