Home राहाता दसऱ्याच्या दिवशी विषबाधेने बहिण भावंडाचा मृत्यू

दसऱ्याच्या दिवशी विषबाधेने बहिण भावंडाचा मृत्यू

Rahata Sibling dies of poisoning

राहता: ऐन दसऱ्याच्या दिवशी राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दोन सख्या बहिण भावंडाचा अन्नातून विषबाधेतून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पाथरे बुद्रुक येथील पंचक्रोषित शोककळा पसरली आहे.

पाथरे बुद्रुक येथील प्रवरा नदीच्या कडेला असणाऱ्या मुलानी गल्लीत वासिम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबांसमवेत राहत असून ते भाजपाला विक्रीचा व्यवसाय करतात. वासिम यांना मुलगा अराहान वय ५ व मुलगी आयेशा वय ४ ही दोन अपत्ये असून त्यांची सासरवाडी हाकेच्या अंतरावर हनुमंतवाडी येथे आहे. वासिम यांचे मुले नेहमी मामाच्या घरी जाणे येणे होते. दोन तीन दिवसांपासून अरहान व आयेशा हे शाविद शेख मामा यांच्या घरी गेले असता दरम्यानच्या काळात मामा शाविद व भाचा भाची यांना दोन दिवस शारीरिक अस्वस्थता जाणवू लागल्याने सोनगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली होती.

रविवारी दसऱ्याच्या दिवशी सकाळी ९ वाजता अरहान, आयेशा, शाविद मामा, आजी शबाना यांची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईक यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अरहान यास मयत घोषित केले. त्यानंतर अर्ध्या तासांच्या अंतराने मुलगी आयशा हिचाही उपचारदरम्यान मृत्यू झाला. दोन भाच्यांचा मृत्यू झाल्याने मामा शाविद यांना मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयातच अतिदक्षता विभागात दाखल करण्यत आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाजात ही घटना अन्नातून विषबाधेतून झाली असल्याचा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Rahata Sibling dies of poisoning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here