सावत्र भाचीच्या गळ्यात मनी मंगळसूत्र घालून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार
राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यात ब्राम्हणी येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नात्याने मामा असलेल्या दिलीप संतोष साठे या आरोपीने अल्पवयीन असलेल्या सावत्र भाचीच्या गळ्यात मनी मंगळसूत्रे घातली आणि तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन १७ वर्षीय मुलगी ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. ती सध्या राहुरी तालुक्यात ब्राम्हणी येथे वडील, भाऊ, बहिण यांच्यासोबत राहत आहे. या पिडीत मुलीची आत्या तेथेच राहते.आत्याचे पतीचे निधन झाल्याने ती दिलीप संतोष साठे यांच्या बरोबर राहते. आत्याने घरी बोलाविल्यामुळे पिडीत मुलगी घरी गेली होती. नात्याने सावत्र मामा असलेल्या दिलीप साठे हा पिडीत मुलीला म्हणाला की, मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. मला तुझ्यापासून एक मुलगा हवा आहे. असे म्हणून त्याने एक मनी मंगळ सूत्र घातले. १५ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२० या दरम्यान पिडीत मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. तसेच दिलीप साठे याची आई मीराबाई हिने पिडीत मुलीला संबंध ठेवण्यास भाग पडले.
त्यांनतर आरोपी दिलीप साठे याने १९ ऑक्टोबर रोजी पिडीत मुलीला हॉटेल माउली येथे नेले. हॉटेल मालकाशी ओळख करून दिली. हॉटेल मालकाने धमकी देत तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केला.
२१ ऑक्टोबर रोजी पिडीत मुलगी तिची आत्या व सावत्र मामा हे अहमदनगर येथील बालकल्याण समिती येथे भेटीसाठी गेले. पिडीत मुलीने घडलेला प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानुसार त्यांनी व पिडीत मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून आरोपी दिलीप संतोष साठे, मीराबाई साठे, माउली हॉटेलचा मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Rahuri raped from time to time by putting Mani Mangalsutra