Home अहमदनगर घरातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता, वडिलांची तक्रार

घरातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता, वडिलांची तक्रार

Kopargaon young ladies missing from home

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रहिवासी असलेल्या व मजुरी काम करत असलेल्या कुटुंबातून आपली २० वर्षीय मुलगी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान कोणाला काही एक न सांगता गायब झाली असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

 याबबत माहिती अशी की, मुलीचे वडील बाळासाहेब मुरलीधर पवार वय ४८ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत आपण आपल्या कुटुंबासमवेत राहत असून दिनांक १७ ऑक्टोबर रोजी घरात झोपलेले असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली आहे. अंगाने सडपातळ , उंची पाच फुट, काळे लांबसडक केस, कपाळावर गोंदलेला टिपका, कानात झुबे असे वर्णन आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोपरगाव पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Kopargaon young ladies missing from home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here