Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात आज ३९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

संगमनेर तालुक्यात आज ३९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Sangamner taluka 39 Corona infected Today

संगमनेर | पत्रकार संजय गोपाळे: आज (बुधवार दि.१४)संगमनेर शहरासह ग्रामीण भागात ३९ कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या  इंदिरानगरमधील ५६ वर्षीय महिला, नेहरु चौक परिसरातील ६४ वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, सावतामाळी नगर ३३ वर्षीय तरुण, ताजणे मळ्यातील ३५ वर्षीय महिला, विद्यानगर ६६  वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह ३५ वर्षीय महिला व १२ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

आज ग्रामीण भागातील ३२ जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले आहे. भोजदरी येथील २५ वर्षीय महिला, चंदनापुरी येथील ३८ वर्षीय तरुण, ढोलेवाडी  ५२ वर्षीय व्यक्ती , घारगाव  २४ वर्षीय महिलेसह ४ वर्षीय लहान मुलगा, गुंजाळवाडी येथे ५२ वर्षीय व्यक्तीसह २८ वर्षीय तरुण, ६२ व ४२ वर्षीय २ महिला, जाचकवाडी येथील २४ वर्षीय महिला, जोर्वे येथील ५४ वर्षीय व्यक्ती, कनोली येथील ५५ वर्षीय महिला, केळेवाडी  ३०वर्षीय तरुण, खळी  ४५ वर्षीय व्यक्ती, कोल्हेवाडी ४० वर्षीय तरुण,

कोळवाडे  ५०वर्षीय व्यक्ती, नान्नज दुमाला ५३ वर्षीय महिला, ओझर खुर्द मधील ५५ वर्षीय व्यक्तीसह २६ वर्षीय महिला व ४ वर्षीय लहान मुलगा, पिंपरी येथील २२ वर्षीय महिला, प्रतापपूर येथील ३५ वर्षीय महिला, रहिमपूर  ५८ वर्षीय व्यक्ती, राजापूर ६० वर्षीय महिला, समनापुर ४८ वर्षीय इसम, तळेगाव दिघे  २५ वर्षीय महिला,

सारोळे पठार ५१ वर्षीय व्यक्तीसह २१ वर्षीय तरुण व १८ वर्षीय तरुणी, व ३२ जणांसह एकूण ३९ जणांचे अहवाल आज कोरोना संक्रमित झाल्याचे प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आज ३९  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३ हजार ८५६ झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner taluka 39 Corona infected Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here