Maratha Kranti Morcha: अकोले तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा
अकोले: तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणाला जी आंतरीम स्थगिती मिळली आहे त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पार पडला.
महात्मा फुले चौकातून शांततेच्या मार्गाने मोर्चा मार्गस्थ झाला व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवंदन करून खटपट नाका मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे काही मराठा बांधवांचे भाषणे झाली. त्यानंतर तहसीलदार मुकेश कांबळे यांना
1. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्य शासनामार्फत कोणत्याही प्रकारच्या शासकीय भरत्या घेऊ नयेत. त्या पुढे ढकलण्यात याव्यात.
- SEBC अंतर्गत राज्य सरकारने व मा. उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्याप्रकाने शिक्षणांमध्ये 12% व नोकरीमध्ये 13% आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तामिळनाडू सरकारच्या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने तातडीची तरदूत करावी.
- मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार व मराठा संघटना यांनी एकत्र येऊन एकत्रित केस चालवावी.
- सन 2020 – 2021 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करावी.
- मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व प्रकारचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे
या मागण्यांसाठी मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने अशी माहिती देण्यात आली की 10 तारखेचा हा मोर्चा प्रतिनिधीक स्वरूपात असला तरी अकोले तालुक्यात 17 ऑक्टोबर रोजी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने तालुकाभर व्याप्ती असणारे मोठे आंदोलन होणार आहे असे कळवण्यात आले.
तसेच यावेळी डॉ. संदीप कडलग, दिलीप शेणकर,संजय वाकचौरे, महेश नवले, मुकुंदा भोर, दत्ता नवले, राजेंद्र कुमकर, सोमनाथ नवले, विनोद हांडे, दादा पाटील वाकचौरे, सुरेश खांडगे, सौ. स्वाती शेणकर, गौरी शेटे, लालूशेठ दळवी, प्रशांत देशमुख, गणेश तोरमल, रोहिदास सोनवणे, विकास बंगाळ, संदीप शेणकर, सुरेश गडाख, मच्छिद्र धुमाळ, अक्षय बोंबले,जालिंदर बोडके, ज्ञानेश्वर गोडसे, वैभव गोडसे, ऋषी लांडे, अक्षय धुमाळ , कौस्तुभ आवारी, शुभम माने, तुषार भांड, संदीप नवले, हे उपस्थित होते. यावेळी सुरेश नवले यांनी सूत्रसंचालन केले व सचिन नरवडे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka Maratha Kranti Morcha