विहिरीत उडी घेऊन प्राध्यापकाची आत्महत्या
राहता | Rahata: राहता तालुक्यातील लोणी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील नोकरीस असलेल्या प्राध्यापकाने आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कोल्हार गावाचे रहिवासी सोमनाथ शांताराम निबे वय ५७ रा. कोल्हार असे या आत्महत्या केलेल्या प्राध्यापकचे नाव आहे. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. लोणी येथील विखे कनिष्ठ महाविद्यालयात ते कार्यरत होते.
निभे यांचा मृतदेह त्यांच्या वस्तीवरील विहिरीत शनिवारी सकाळी आढळून आला. विहिरीजवळच त्यांची मोटारसायकल उभी होती.
निबे यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Rahata Taluka Professor sucide