राहुरी: शिवाश्रम फाउंडेशनची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न
राहुरी: शिवाश्रम फाउंडेशनची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न
राहुरी:शिवाश्रम फाउंडेशनची राज्यस्तरीय बैठक येथील हॉटेल साई अजिंक्य येथे नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर विजय तनपुरे होते.
बैठकीत शिवाश्रमचे नियोजित संपर्क कार्यालय तसेच शिवाश्रम वर्तमान पत्र, शिवाश्रम बांधण्यासाठी निधी संकलन करणे त्याचबरोबर अंध, अंपग, निराधार व ज्या आईवडीलांना त्यांचे मुले सांभाळ करत नाही अशा आईवडीलांना त्याचबरोबर वृद्ध कलावंत स्वाभीमानाने जगू शकतील व गोरगरीब खेड्यातील वाड्यावसत्तीवरील मुलामुलांना मोफत अभ्यासिका त्या क्षेत्रातील यश संपादन केले, असे अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन असे ज्या-ज्या क्षेत्रात अनुभवी व्यक्ती आहेत त्या क्षेत्रातील व्यक्ती शिवाश्रमसाठी त्यांच्या पद्धतीने यामध्ये झोकून देणार आहोत, असे बैठकीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी सांगितले. शिवाय, विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीचे प्रस्ताविक मुकुंद सिणगर यांनी केले.
You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date
शिवाश्रम उभारण्यासाठी उत्तमराव गाढे, गीताताई विखे पाटील, नंदा वराळे, सोनू शेवाळे, गीताताई गुजर यांनी मदत जाहिर केली.
You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0
यावेळी शाहीर नाना शिंदे (पुणे), बाळासाहेब तनपुरे, रुद्राक्ष जाधव (येवला), विलास पाटणी (श्रीरामपूर), पत्रकार राहुल कोळसे पाटील (नेवासा), मोहिनीराज मुळे (शिर्डी), डॉक्टर अनिल धनवट (पुणे), गणेश तनपुरे (पुणे), शंकर वाबळे (कोपरगाव), सचिन धसाळ (राहुरी), मनोज शिंदे (राहुरी), गौरव तनपुरे (राहुरी), पत्रकार संजय महाजन (शिर्डी), विशाल गाडेकर (राहता), विजय डोंगरे (निफाड), रवींद्र आहेर (निफाड), चेतन चौधरी (शिर्डी), दिलीप चव्हाण (आष्टी), सुदामराव खालकर (निफाड), सचिन पागिरे (दवणगाव), विश्वनाथ वाघ (चितळी), विनोद पठारे (नांदुर-शिंगोटे), कुणाल पठारे (नांदुर-शिंगोट), सुशांत राऊत (श्रीगोंदा), सुनंदा वराळे (राहुरी), गीता विखे (लोणी), मंगेश निपानीकर, अभियंता मुंकुंदा भोर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आभार कॅप्टन आप्पासाहेब ढुस यांनी मानले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
