कर्जतमध्ये भाजपच्या दोन नगरसेवकांनी हातात बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ
कर्जत | karjat: कर्जत नगरपंचायतीच्या दोन भाजप नगरसेवकांनी भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधले आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजप माजी मंत्री प्रा. राम शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय.
कर्जत तालुक्यात भाजप पक्षात पडलेले गट तट, यामुळे होणारी कोंडी, नेतृत्वात काम करण्याची मानसिकता याला कंटाळून कर्जत नगरपंचायतचे नगरसेविका मनीषा सोनमाळी व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
कर्जत येथील रोहित पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर वर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
पुढील काही काळात तालुक्यातील अनेक मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी दिली.
कर्जत नगरपंचायत आगामी निवडणुक सत्ता परिवर्तनाची सुरुवात आहे असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Karjat Two BJP corporators tied NCP watches in their hands