मुलाला नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेचे शोषण
नेवासा | Nevasa: भिंगार येथील कॅन्टोनमेंट बोर्डात मुलाला नोकरीस लावून देतो असे आमिष देऊन एका महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या कॅन्टोनमेंट बोर्डातील सिनियर क्लार्कच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या महिलेवर अत्याचार करून तिला धमकी देण्यात आली आहे. शिशिर पाटसकर असे या गुन्हा दाखल झालेल्या क्लार्कचे नाव आहे.
याबाबत पिडीत महिलेने २० सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. शिशिर पाटसकर याने तुमच्या मुलाला कॅन्टोनमेंट बोर्डात नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले. त्यानंतर पिडीत महिलेस २०१७ मध्ये नेवासा येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर नगर शहरातील एमआयडीसी येथे अत्याचार केला. तसेच त्याने धमकी दिल्याचे फिर्यादीत सदर महिलेने म्हंटले आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही अजून आरोपीस अटक झालेली नाही.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Nevasa woman by showing the lure of giving a child a job