Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ४० नवे करोनाबाधित तर एकाचा मृत्यू

Sangamner: संगमनेर तालुक्यात ४० नवे करोनाबाधित तर एकाचा मृत्यू

Sangamner taluka 40 corona positive one death

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात 40 नवे करोनाबाधित आढळून आले आहेत तर एकाचा करोनाने बळी घेतला आहे. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,805 इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरात नेहरु चौक येथील 26 वर्षीय तरुण, स्वामी समर्थनगर येथे  33 वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे 20 वर्षीय महिला,  नवघर गल्ली येथे 35 वर्षीय पुरुष, जनता नगर येथे 40 वर्षीय पुरुष असे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. 

तर तालुक्यात आश्वी खुर्द येथे 35 वर्षीय महिला, पेमरेवाडी येथे 15 वर्षीय मुलगी, कोठे बुद्रुक येथे 55 वर्षीय पुरुष,  चिंचपूर येथे 20 वर्षीय तरुण, हिवरगाव पठार येथे 85 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे 72,50 वर्षीय महिला, 46, 19,15 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 48 वर्षीय महिला, रायतेवाडी मधील 55 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, पेमगिरी येथे 75, 57 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 70 वर्षीय पुरुष, सांगवी मधील 60 वर्षीय महिला, लोहारे येथे 73 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 45, 40 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथे 73 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष,  मालदाड येथे  54 वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे 53 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथे 26 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 60 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे 38, 37 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथे 40 वर्षीय पुरुष, 58,38 वर्षीय महिला, कनोली येथे 33 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 57 वर्षीय पुरुष असे 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याची रुग्णसंख्या 2,805 वर पोहोचली आहे.

राजापूर येथील 78 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Sangamner taluka 40 corona positive one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here