राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण
मुंबई: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चालला आहे. राज्यातील शिक्षणमंत्री यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या”
संपूर्ण देशातच करोनाने थैमान घातले आहे. करोना सर्व देशातच व्यापून गेला आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा ५६ लाखांच्या पलीकडे गेला आहे. करोनाबाधितांत आमदार, खासदार, मंत्री, अभिनेत्री असे सर्व विभागातील नागरिकांना सोडले नाही.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Education Minister Varsha Gaikwad corona infected