Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात २६ करोनाबाधित वाढले

Sangamner: संगमनेर तालुक्यात २६ करोनाबाधित वाढले

Sangamner Taluka 26 corona positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 26 करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,664 इतकी झाली आहे,

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात गणेशनगर येथे 56 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथे 50 वर्षीय पुरुष , माताडे मळा येथे 22 वर्षीय तरुण, 20 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथील 47 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 16 आणि 12 वर्षीय बालक, कुरणरोड येथील 43 वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आले आहेत.  

तर तालुक्यात गुंजाळवाडी येथे 75, 56, 40, 20,18 वर्षीय महिला, पिंपरणे येथे 39 वर्षीय पुरुष,  मालदाड येथे 63 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 39 वर्षीय पुरुष, वनकुटे येथे 43 वर्षीय पुरुष,  वडगाव लांडगा येथे 65 वर्षीय पुरुष, देवकौठे येथे 52 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे 26 वर्षीय तरुण, सायखिंडी येथे 43 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 70 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, जांबुत खुर्द येथे 38 वर्षीय पुरुष तर अंभोरे येथे 33 वर्षीय महिला असे 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 26 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here