Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीला पळून नेणाऱ्या आरोपीला अटक

संगमनेर: अल्पवयीन मुलीला पळून नेणाऱ्या आरोपीला अटक

Sangamner Accused of kidnapping minor girl arrested

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी किरण बर्डे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी किरण बर्डे १९ नोहेंबर २०१८ रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेले होते. या गुन्ह्याचा तपास न लागल्याने ७ ऑगस्ट २०२० रोजी ह्या गुन्ह्याचा तपास मानवी वाहतूक कक्षाकडे हस्तांतरित केला होता.

मुलीला पळून नेणाऱ्या किरण बर्डे वय २१ रा. निमगाव जाळी याला अनैतिक मानवी वाहतूक प्रतीबांधक कक्षातील पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक वसंत पथवे व त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी तपास करीत होते. पोलीस निरीक्षक पथवे यांना पिडीत मुलगी व आरोपी बर्डे संगमनेर तालुक्यातील लोहारे शिवारात राहत असल्याची माहिती समजली. पिडीत मुलीसह आरोपी बर्डे याला अटक करण्यात आली असून संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Sangamner Accused of kidnapping minor girl arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here