Ahmednagar: जिल्ह्यात ५८१ रुग्ण बरे होऊन घरी तर १७३ जणांची भर
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज दुपारी बारा वाजेपर्यंत १७३ रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यातील ५८१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८५.७९ टक्के इतके झाले आहे.
जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४७३१ इतकी आहे. सध्या उपचार सुरु असलेले रुग्णांची संख्या ३६६६ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४३२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २८८२९ वर पोहोचली आहे.
आज शुक्रवारी करोना बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८, पाथर्डी ०४,, नगर ग्रा. बाधीत आढळूण २०, कॅंटोन्मेंट ०३, नेवासा २३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२, जामखेड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज ५८१ रुग्णांना बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ६८, राहाता ४६, पाथर्डी ४६, नगर ग्रा.०८, श्रीरामपूर ३८, कॅंटोन्मेंट १०, नेवासा ४७, श्रीगोंदा ४०, पारनेर २२, अकोले ०६, राहुरी २४, शेवगाव १७, कोपरगाव ३३, जामखेड २१, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
Web Title: Ahmednagar Coronavirus Report today