Corona News: अकोले तालुक्यात ११ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Corona News: अकोले तालुक्यात करोना रुगनांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनास काही प्रमाणात यश आहे. अकोले तालुक्यात अॅटीजेन चाचणीत १० तर शासकीय प्रयोगशाळेतून एक असे ११ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७५४ इतकी झाली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १२६ इतकी आहे.
आज गुरुवारी ११ करोनाबाधित आढळून आले यामध्ये शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ८० वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे.
अॅटीजेन चाचणीत शाहूनगर येथील ३२ वर्षीय पुरुष, पाडाळणे येथील ७५ वर्षीय व २६ वर्षीय पुरुष, १७ वर्षीय तरुणी, शेंडी येथील २५ वर्षीय तरुण, टाहाकारी येथील ४५ वर्षीय, ३५ वर्षीय पुरुष तर १८ वर्षीय तरुणी, समशेरपूर येथील ३६ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात ११ करोनाबाधित आढळून आल्याने एकूण संख्या ७५४ इतकी झाली आहे.
See Also: Toronto Film Fest Reverses Controversial Face Mask Policy
Web Title: Corona News Akole Taluka 11 infected today