Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात ६२५ करोनाबाधितांची भर
अहमदनगर | Coronavirus: जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६२५ करोनाबाधितांची भर पडली आहे. सद्यस्थितीत उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४०४६ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २२८, खासगी प्रयोगशाळेत २२२ तर अॅटीजेन टेस्टमध्ये १७५ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २२८ रुग्णांमध्ये मनपा १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर २, कॅन्टोनमेंट १, नेवासा ४, श्रीगोंदा २, पारनेर १, राहुरी २, शेवगाव ४८, कोपरगाव १, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पिटल १४, इतर जिल्हा ६ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत २२२ रुग्ण यामध्ये मनपा १३३, संगमनेर १, राहता १२, पाथर्डी ३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ७, कॅन्टोनमेंट २, नेवासा १, श्रीगोंदा ५, पारनेर ६, राहुरी १३, शेवगाव २, कोपरगाव ६, जामखेड ५, कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अॅटीजेन टेस्टमध्ये १७५ रुग्ण यामध्ये संगमनेर १९, राहता १४, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १५, नेवासा ३१, श्रीगोंदा १५, अकोले ४, राहुरी २, शेवगाव २० जामखेड २८, कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २७,१०९ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू ३८९ झाली आहे.
Web Title: Coronavirus Ahmednagar 625 infected increased