Coronavirus: संगमनेर तालुक्यात ४० करोना पॉझिटिव्ह
संगमनेर | Coronavirus: संगमनेर तालुक्यात रविवारी 40 करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची करोनाबाधितांची संख्या 2001 इतकी झाली आहे.
रविवारी करोना बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील 8 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पाटील मळा रस्त्यावरील 29 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 52 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालपाणी लॉन्स येथे 73 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे 6 वर्षीय बालक, सावतामाळी नगर येथील 45 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील 56 वर्षीय महिला व इंदिरानगर येथील 34 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.
तर तालुक्याच्या रुग्ण संख्येत 32 रुग्णांची वाढ झाली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवाल यामध्ये जाखोरी येथील 55 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. तर खासगी प्रयोगशाळेतून अहवालानुसार तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे 22 वर्षीय तरुण, अकलापुर येथे 51 वर्षीय पुरुष , निमगाव जाळी येथे 80 वर्षीय वृद्ध, चिखली येथे 76 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, कासारे येथे 57 वर्षीय पुरुष , नांदुरी दुमाला येथे 29 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथे ६० वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, समनापुर येथील 31 वर्षीय पुरुष, रायते येथे 50 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा , कौठे धांदरफळ येथे ६० वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 56, 50, 37, 36, 36, 35, 17, 13, 14, 11, 4, 13, वर्षीय महिलांसह 41 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय व ४ वर्षीय बालक असे 15 जण बाधित आढळून आले आहेत. खराडी येथे 48 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित आढळून आला आहे.
Web Title: Coronavirus Sangamner Taluka 40 infected