Akole: अकोले तालुक्यात तीन व्यक्ती कोरोना बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी तीन करोनाबाधित आढळून आले आहेत त्यामुळे अकोले तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५१६ इतकी झाली आहे.
अकोले तालुक्यात आज समशेरपुर ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये सावरगाव पाट येथील ३५ वर्षीय महीला व राजुर ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टध्ये आदिवासी भागातील वारंघुशी येथील ३३ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात धामणगाव आवारी येथील ३८ वर्षीय पुरूषाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे, अशी एकुण ३ व्यक्ती बाधित आले तर काल खानापुर कोविड सेंटर येथून अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या ३४ अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तर आज पुन्हा खानापुर कोविड सेंटर व कोतुळ ग्रामीण रूग्णालयातुन ५४ अहवाल अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५१६ झाली आहे.
पत्रकार: अल्ताप शेख अकोले
Web Title: Akole taluka three corona infected