Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात आणखी ४३ रुग्णांची वाढ
संगमनेर | Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात बुधवारी सकाळी शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात १९ करोनाबाधित आढळून आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा अॅटीजेन चाचणी अहवालात ४३ नवीन रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १४९३ इतकी झाली आहे.
संगमनेर शहरात जनतानगर ४८,२६,१९ वर्षीय महिला, खंडोबागल्ली ५८ वर्षीय महिला, ३६ वर्षीय तरुण साळीवाडा ७८ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर ६५ वर्षीय महिला, माळीवाडा ६०,५५,२६ वर्षीय महिला, उपासनी गल्ली ७५ वर्षीय महिला असे ११ बाधित आढळून आले आहेत.
तालुक्यातून गुंजाळवाडी येथे ५२ वर्षीय व्यक्ती, ४३ वर्षीय महिला, १६ वर्षीय तरुणी, ८ वर्षीय बालक, कुरकुटवाडी ४६ वर्षीय महिला, चंदनापुरी ४९ व ३७ वर्षीय पुरुष, ३४ व ३३ वर्षीय महिला, २ वर्षीय बालिका, वडगाव पान येथे २७ वर्षीय महिला, २१ वर्षीय तरुण, मेंढवन येथे ३४ वर्षीय तरुण, ३० वर्षीय महिला, गोरक्षवाडी ६८ वर्षीय वृद्ध, २८ वर्षीय तरुण,३४ वर्षीय महिला, व 9 वर्षीय बालिका, रहिमपूर येथे 65 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालिका, चिकणी येथे 53 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, राजापूर 21 दिवसांची बालिका, संगमनेर खुर्द 32 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी 26 वर्षीय तरुण, दोन वर्षीय बालिका व दोन वर्षीय लहान मुलं, पानोडी येथील 65 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 57 व 50 वर्षीय महिला, 40 वर्षीय तरुण यांना करोनाची लागण झाली आहे. असे एकूण ४३ रुग्णांची भर पडली आहे.
Web Title: Sangamner Taluka 43 corona infected