Sangamner: संगमनेर तालुक्यात २० करोनाबाधितांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी २० करोनाबाधितांची वाढ झाली आहे. शहरात ११ जण तर ग्रामीण भागातून ९ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १३७३ इतकी झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेतील प्राप्त अहवालानुसार शहरातील रंगारगल्ली येथे ३५ वर्षीय व्यक्ती, बडोदा बँक कॉलनीत ३५ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे ४० वर्षीय महिला असे तीन अहवाल प्राप्त झाले आहेत.
तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट मधून गोल्डन सिटी येथे ४५ वर्षीय, २० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, १८ वर्षीय तरुणी, साळीवाडा येथे ५५ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे कृष्णानगर ४९ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ५४ वर्षीय, ५७ वर्षीय महिला, शहरातील साळीवाडा येथे ७०,५५,वर्षीय महिला व ४७ वर्षीय व्यक्ती, खंडोबा गल्ली येथे ५८ वर्षीय व्यक्ती, ५२ वर्षीय महिला,१४ वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथे २२ वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथे ४५ वर्षीय तरुण, घासबाजार येथे ६४ वर्षीय महिला, उपासनी गल्ली येथे ७४ वर्षीय महिला अशा रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
Web Title: Sangamner Taluka 20 corona patient increased