Home महाराष्ट्र सुशांत राजपूत प्रकरण: रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेबाबत केला खुलासा

सुशांत राजपूत प्रकरण: रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेबाबत केला खुलासा

Aditya Thackeray sushant Case

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सध्या सुरु आहे. सुशांत प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात होते. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असे असे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर आता रिया चक्रवर्तीने मेडियासाठी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश माने यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात रियाने म्हंटले आहे की, आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही. आदित्य ठाकरे कोण आहेत हे तिला माहित नाही. तिने कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधला नाही, असे स्पष्टीकरण निवेदनात प्रसिद्ध केले आहे.

या निवेदनात सुशांत आणि रियाच्या नात्याची सुरुवात कशी झाली याचेदेखील माहिती देण्यात आली आहे. एकाच क्षेत्रात काम करीत असल्याने सुशांत आणि रिया एकमेकांना ओळखायचे, त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. ते एकमेकांशी अधूनमधून संवाद करायचे. एप्रिल २०१९ मध्ये सुशांत एका पार्टीला गेला होता. त्यानंतर सुशांत आणि रिया डेट करण्यास सुरुवात झाली.  

See Latest Marathi News

Website Title: Riya Chakravorty reveals about Aditya Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here