अकोले तालुक्यात शेरणखेल येथे एकाच कुटुंबात आठ सुलतानपूर येथे एक करोनाबाधित
अकोले |Akole : अकोले तालुक्यात काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल ९ करोनाबाधित आढळून आले आहेत. यात शेरणखेल येथे एकाच कुटुंबातील आठ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर कळसच्या जवळ सुलतानपूर येथे एक करोनाबाधित आढळून आला आहे.
यात शेरणखेल येथे ८६,५८,३२ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगी, ५२,४०,३० वर्षीय मुलगा करोनाबाधित आढळून आला आहे. तर सुलतानपूर येथे २५ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे. त्याचंबरोबर ४३ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या १२० इतकी झाली आहे. त्यामधील ६८ जण बरे होऊन घरी परतले आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील ४९ जणांवर उपचार सुरु आहेत.
अकोले तालुक्यात दररोज नवीन गावात करोनाचा शिरकाव होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Akole taluka Sherankhel and Sultanpur 9 corona infected