संगमनेरात शनिवारी एकाच दिवशी ४५ करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात शनिवारी सकाळी ११ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर रात्री उशिरा ३४ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शनिवार हा संगमनेरसाठी धक्कादायक ठरला आहे. एकाच दिवशी ४५ करोना बाधित आढळून आले आहेत.
शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार घोडेकरमळा, पदमानगर, माळीवाडा, इंदिरानगर, देवीगल्ली, बाजारपेठ, कसारा दुमाला वडगाव लांडगा येथे ११ रुग्ण आढळून आले आहेत.
शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात एका राष्ट्रीयकृत बँकेतील तीन कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. या बँकेतील ३५ व ३३ वर्षीय पुरुष तर २७ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.
संगमनेर शहरात तहसील कचेरीजवळ ५३ वर्षीय व्यक्ती, गणेशनगर ३३ वर्षीय महिला, १० व २ वर्षीय बालिका, खंडोबा गल्ली ७२ वर्षीय व्यक्ती, ४० वर्षीय युवक, जेधे कॉलनी ५२ व २१ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, माळीवाडा येथे २८ वर्षीय महिला, ६ व १ वर्षीय बालक यांना करोनाची लागण झाली आहे. विद्यानगर ४७,३४ वर्षीय व्यक्ती,बाजारपेठ ५८ वर्षीय महिला, ३६ वर्षीय तरुण, जनतानगर ४५ वर्षीय व्यक्ती, ३७ वर्षीय महिला, पदमानगर २८ वर्षीय पुरुष, ४७, २२ वर्षीय महिला व एका तीन वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली आहे.
संगमनेर तालुक्यात सुकेवाडी ६५ वर्षीय, ४२ वर्षीय व ४५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी ४५ वर्षीय महिला, राजापूर ३० वर्षीय युवक, कोंचितील २२ वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा १५ वर्षीय मुलगा, शिबलापूर २३ वर्षीय महिला, कुरण ४५ वर्षीय पुरुष असे ३४ व्यक्तीचे शासकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या ५२८ झाली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner taluka 45 infected