Home अकोले अकोले शहरात करोनाचा थेट तहसील कार्यालयात प्रवेश

अकोले शहरात करोनाचा थेट तहसील कार्यालयात प्रवेश

Coronavirus Akole tahasil corona entry

Coronavirus/अकोले: अकोले शहरातील थेट तहसील कार्यालयातच प्रवेश केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारीच करोनाबाधित आढळून आला आहे. 

अकोले तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७५ इतकी झाली आहे. तालुक्यातील काल दोन तर आज एक जण करोनामुक्त झाला आहे. 

तहसील कार्यालयातील एका ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा कर्मचारी नवलेवाडी फाटा नजीकचा रहिवासी आहे. तहसील कार्यालयात नेहमी बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ चालू असते. या कर्मचाऱ्याला नेमकी कशामुळे, कोणामुळे करोनाची लागण झाली याचा शोध प्रशासन करीत आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. २४ जणांवर उपचार सुरु आहेत तर ३ जण मयत झाले आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole tahasil corona entry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here