गुड न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात ५३ रुग्ण करोनातून मुक्त
Coronavirus/अहमदनगर: जिल्ह्यात आज ५३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४३७ इतकी झाली आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर एक, अकोले दोन, नगर ग्रामीण चार, जामखेड दोन, राहता दहा, शेवगाव दहा आणि नगर शहर २४ यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. दोन दिवसांपूर्ही १११, काल १०० आणि आज ५३ असे रुग्ण करोनातून मुक्त होत आहे. जिल्ह्यासाठी हे प्रमाण दिलासादायक ठरत आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवारी करोनाचा आढावा घेण्यासाठी २४ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता दौऱ्यावर येणार आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Ahmednagar 53 patient corona free