Home अहिल्यानगर लॉजिंगवर मोठी कारवाई, वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश, तीन पीडित महिलांची सुटका

लॉजिंगवर मोठी कारवाई, वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश, तीन पीडित महिलांची सुटका

Breaking News | Ahilyanagar Prostitution: लॉजिंगवर मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक आणि व्यवस्थापकाला अटक.

Prostitution den busted, three women rescued

श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लॉजिंगवर मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

नेवासे येथील खडका फाट्यावरील साई लॉज येथे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देह व्यापारास (वेश्या व्यवसाय) प्रवृत्त करत लॉजिंगवर जागा उपलब्ध करून त्यांच्याकडून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी आपल्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

बुधवारी पोलीस पथकाने नेवासे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक महेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा वैद्य, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे यांना सोबत घेत माहिती मिळालेल्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच छापा टाकला. कारवाईदरम्यान तीन महिला आढळून आल्या त्यांच्याकडे पथकाने चौकशी केली असता त्यांनी आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची व त्या पैशावर उपजीविका चालत असल्याची माहिती दिली.

कारवाईत पोलीस पथकाने बाळासाहेब भानुदास जाधव (वय २५ वर्ष, रा. मुक्तापूर, ता. नेवासा जि. अहिल्यानगर व विकास योगेश उर्फ यहुबा औताडे (वय २५ वर्षे, रा. मुक्तापूर, ता. नेवासे, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. हे दोघेही पीडित तीन महिलांच्या माध्यमातून कुंटणखाना चालवत असल्याचे कारवाई स्पष्ट झाले.

त्यांच्या विरोधात पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहे.

Breaking News: Prostitution den busted, three women rescued

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here