Home संगमनेर संगमनेरमध्ये अवैधरित्या नशेच्या इंजेक्शन्सची विक्री

संगमनेरमध्ये अवैधरित्या नशेच्या इंजेक्शन्सची विक्री

Breaking News | Sangamner:  शहर पोलिसांची कारवाई; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

Illegal sale of drug injections in Sangamner

संगमनेर: –शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील एम. आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे औषधे अवैधरित्या विकली जात होती. यावर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कारवाई करत २ लाख २३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय बातमीदाराकडून लालबहादूर शास्त्री चौकातील एम. आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारे इंजेक्शन अवैधरित्या विकले जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोहेकॉ. बाबासाहेब सातपुते, पोकॉ. विजय खुळे, क्षीरसागर यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सदर पथकाने वरील ठिकाणी जावून छापा टाकला असता आदित्य किशोर गुप्ता (वय २४, रा. साईनगर, संगमनेर) हा विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून ६ हजार ६०० रुपयांचे नशेचे इंजेक्शन्स, २७० रुपयांचे इंजेक्शन सिरींज, ८० हजार रुपयांचा मोबाइल, १ लाख २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच.१५, एचपी. ६६४६), १६ हजार २५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख २३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ. बाबासाहेब सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आदित्य गुप्ता याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १२३, १२५, २७८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे.

Breaking News: Illegal sale of drug injections in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here