Home अकोले अकोले तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Akole Suicide: तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या.

Akole Youth commits suicide by hanging

राजूर अकोले तालुक्यातील फोफसंडी येथील नितीन पोपट वळे (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली.

 याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजूर ते पिंपरकणेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बाभळीच्या झाडाला नितीन वळे याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व पोहेकॉ. नरोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताला ग्रामीण रुग्णालय राजूर येथे हलविण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. एस. ए. मंडलिक व नरोडे करीत आहेत.

Breaking News: Akole Youth commits suicide by hanging

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here