अहिल्यानगर ब्रेकिंग! बसस्थानकात आढळला युवकाचा मृतदेह, घातपाताचा संशय
Breaking News | Ahilyanagar: सोनई येथील एका २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला, घातपाताचा संशय : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार.

श्रीरामपूर: शहरातील मयूर नलवडे बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी सोनई येथील एका २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, नातेवाइकांनी तरुणाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मयूर नलवडे हा बुधवारी (दि. २२) घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नव्हता. त्याचा कुटुंबीयांनी शोध घेतला होता. शनिवारी (दि. २५) सकाळी श्रीरामपूर बसस्थानक परिसरात त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोनई पोलिसांकडून ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मयूर याचा मोठाभाऊ आशुतोष नलवडे (रा. सोनई) यांनी ओळख पटवली. मयूर हा व्यवसायाने चालक होता, अशी माहिती नातेवाइकांकडून देण्यात आली.
घटनेनंतर नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिस आणि संबंधित व्यक्तींच्या समजुतीनंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
Breaking News: Body of youth found at bus stand, murder suspected
















































