संतापजनक, सहावीतील मुलीला लॉजवर नेऊन नराधमांकडून अत्याचार
Breaking News | Nagpur Crime: 12 वर्षांच्या सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना.

नागपूर: एक संतापजनक घटना उघड झाली आहे. नागपूरात 12 वर्षांच्या सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला नागपूर जवळच्या भिलगाव परिसरातील लॅाजवर नेऊन दोन आरोपींनी अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. शहराच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या चिमुकलीसोबत हि संतापजनक घटना घडलीय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यातील आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढले. सोबतच कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल आणि जीवे मारण्याची धमकी हि दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना अटक केली. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी हि अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी पिडीतेच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Breaking News: Sixth grade girl taken to lodge and raped by men
















































