Home कर्जत दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून घरातून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून घरातून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

कर्जत: कर्जत तालुक्यातील कोंभळे येथे मंगळवारी ७ जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सेवानिवृत्त वृद्ध दाम्पत्याला दोन जणांनी चाकूचा धाक दाखवत दमदाटी करत घरातून १ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.

याबाबत चंद्रकला केशवराव गांगुर्डे यांनी मिरजगाव दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे या फिर्यादीनुसार गांगुर्डे दाम्पत्य रात्री जेवण करून हॉलमध्ये झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास घरात आवाज आल्याने चंद्रकला यांना जाग आली. काही कळण्याच्या दोघेजण त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. त्यातील एकाने त्यांना चाकूचा धाक दाखवून दमदाटी करत गप्प राहण्यास सांगितले. दुसऱ्याने हॉलमधील कपात शोकेस किचन बेडरूम मधील सामानाची उचकापाचक केली. गेली अर्धा तास ते उचकापाचक करत होती.

मात्र त्यांचे पती केशवराव यांना ऐकू नसल्याने त्यांना या प्रकारची चाहूल लागलीच नाही. त्यानंतर जाताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेऊन पळ काढला. यांनतर त्यांनी आपल्या पतीला उठवून घडलेला प्रकार सांगितला. गावातील नातेवाईक व घोगरगाव येथे डॉक्टर व्यवसाय करणाऱ्या मुलाला झालेल्या घटनेची माहिती दिली.

या घटनेनंतर मिरजगाव दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Karjat stole lakh from the house in fear of a knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here