Home अकोले अकोले: आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

अकोले: आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

Breaking News | Akole Crime: एकाने समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अकोले पोलिसांत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल झाला.

Offensive post case registered

अकोले: तालुक्यातील कोतूळ येथे एकाने समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अकोले पोलिसांत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अहिल्यानगरचे नाव खोडून सदर ठिकाणी ‘बापाचे नाव बदलल्याने बाप बदलणार नाही’ अशी पोस्ट सलीम लतीफ शेख (रा. कोतूळ) या तरुणाने केली होती. त्यानंतर परत पुन्हा त्याच अकाउंटवरून ‘अखंड हिंदुस्तानचा बाप एकच बादशाह औरंगजेब’ अशी कमेंट करून सर्व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विनोद अशोक देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सलीम शेख याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे करीत आहेत.

Breaking News: Offensive post case registered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here