इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने दिली पुढील तारीख
संगमनेर: पुत्रप्राप्तीच्या वक्तव्यावर अडचणीत आलेल्या प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
आज त्यांच्याविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने प्रोसेस करण्यास सुरुवात केली आहे. न्यायाधीश पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले. त्यामुळे प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज ) आता ७ ऑगस्टला संगमनेर न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. सरकारी वकील लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली.
सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर संतती रांगडी होते, असे वादग्रस्त विधान आपल्या कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी नगर येथे केले होते.
Website Title: Indorikar Maharaj given Next Date