शाळेच्या गेटवरच दुर्दैवी घटना, सहावीतील मुलीचा हॉर्ट अटॅकने मृत्यू
Breaking News | Nashik school student collapses due to heart attack: नाशिकमधील सहावीतील श्रेया कापडी हिला शाळेच्या गेटवरच चक्कर, शिक्षकांनी तात्काळ रुग्णालयात नेले, पण मृत घोषित, हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, आधीपासून त्रास होता, शहरात आणि शाळेत हळहळ, बालवयात वाढते हॉर्ट अटॅकचे प्रमाण.
नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या सहावीतील मुलाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. य आज सकाळी शाळेच्या गेटवरच मुलीला चक्कर आल्यामुळे खाली कोसळली. शिक्षक अन् शिपायांनी तात्काळ तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तिचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या श्रेया किरण कापडी या सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना अचानक चक्कर आल्याने ती कोसळली. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता.
श्रेया हिच्या जाण्याने कापडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये आणि शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रेयाच्या अकाली जाण्याने नाशिककर हळहळले असून कापडी कुटुंबाच्या दुखात सहभागी झाले आहेत. त्यांना धीर दिला जातोय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये हॉर्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना बसल्या जागी अथवा काम करताना, व्यायाम करताना हॉर्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.
Breaking News: Nashik school student collapses due to heart attack