संगमनेर: ५० रुपयांसाठी शिक्षकाच्या डोक्यात टाकला दगड
Breaking News | Sangamner: दारू प्यायला ५० रूपये दिले नाही; या कारणातून एका १७ वर्षीय मुलाने रस्त्याने जाणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर: दारूची नशा भागविण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र दारू प्यायला ५० रूपये दिले नाही; या कारणातून एका १७ वर्षीय मुलाने रस्त्याने जाणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना संगमनेर येथे समोर आली आहे. प्राणघातक हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास वाघमारे हे ६ ऑगस्टच्या रात्री रस्त्याने जात होते. यावेळी त्यांना एका तरुणाने अडवले. आधीच नशेत धुंद असलेल्या तरुणाने वाघमारे यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५० रुपयांची मागणी केली. मात्र वाघमारे यांनी त्या तरुणाला नकार देताच संबंधित तरुणाने त्यांना खालीपाडून मारहाण केली आणि बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात टाकला.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसरातील देशी दारूच्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वाडेकर गल्ली परिसरातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी सदर तरूणास ताब्यात घेतले आहे. जखमी सुहास वाघमारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Breaking News: Stone thrown at teacher’s head for Rs. 50