Home नगर संगमनेर, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पंजाबरावांचा खास अंदाज! ऑगस्टच्या ‘या’ तारखांना पडणार मुसळधार पाऊस

संगमनेर, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पंजाबरावांचा खास अंदाज! ऑगस्टच्या ‘या’ तारखांना पडणार मुसळधार पाऊस

Breaking News | Sangamner | Panjab Dakh:– , साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होण्याची स्थिती.

Heavy rains Punjabrao's special forecast for Sangamner, Ahilyanagar

अहिल्यानगर: राज्यामध्ये सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र आज देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता. परंतु उर्वरित राज्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत असल्याने कमाल तापमानात देखील वाढ झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पारा 30 सेंटीग्रेडच्या पुढे गेल्याचे चित्र असल्याने आणि त्यातच आता पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पिकांसाठी ही परिस्थिती समस्या निर्माण करणारी ठरू शकते.

त्यामुळे आता पुन्हा पावसाला कधी सुरुवात होईल? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तसेच हवामान विभागाने म्हटले आहे की, साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होण्याची स्थिती आहे. परंतु हवामान विभागाने दुसऱ्या टप्प्यातील हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस तसा कमी राहील.

परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांचा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला व त्यानुसार जर बघितले तर ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात समाधानकारक पाऊस पडेल असे आपल्याला दिसून येते. पंजाबरावांनी अंदाज वर्तवताना खास अहिल्यानगर जिल्ह्यासाठी व तेथील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असा अंदाज वर्तवला. नेमके पंजाबरावांनी काय म्हटले? याची माहिती थोडक्यात बघू.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांचा महाराष्ट्रासाठीचा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला. परंतु हा अंदाज वर्तवताना त्यांनी खास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती दिली.त्यांनी म्हटले की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला. परंतु काही ठिकाणी मात्र समाधानकारक पावसाने अजूनपर्यंत हजेरी लावलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणचे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

या अनुषंगाने त्यांनी सांगितले की,येत्या 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधी दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल. तसेच खासकरून 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर आणि अहिल्यानगर शहर व परिसर या ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावेल व या पावसाची तीव्रता इतकी राहील की शेतामधून देखील पाणी बाहेर येईल.

त्यामुळे खरीप पिकांसाठी हा पाऊस खूप महत्त्वाचा ठरणार असून पिकांना जीवदान यामुळे मिळण्यास मदत होईल. असे पंजाब रावांनी म्हटले. इतकेच नाही तर अहिल्यानगर जिल्हा सोबतच राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 8 ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. साधारणपणे 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान राज्यात व विदर्भामध्ये 8 ते 16 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला.

Breaking News: Heavy rains Punjabrao’s special forecast for Sangamner, Ahilyanagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here