Home पुणे दहावी उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या

दहावी उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Breaking News | Pune Suicide: दहावी उत्तीर्ण झालेल्या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of a minor girl who passed 10th standard

लोणी काळभोर: दहावी उत्तीर्ण झालेल्या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजी नगर परिसरात घडली असून, गुरुवारी (ता.३१ जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

रोशनी संतोष पसरडे (वय १७, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. रोशनी पसरडे ही दहावी उत्तीर्ण झाली असून, ती कुटुं‌बासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहत होती. रोशनीच्या इच्छेप्रमाणे तिचा विवाह ठरला होता. तसेच तिचा साखरपुडा देखील रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. दरम्यान, रोशनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरातील खोलीत साडीच्या सहाय्याने फॅनना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती तिच्या नातेवाइकांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला लोणी काळभोर येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, रोशनी पसरडे हिचे मनाप्रमाणे लग्न ठरले होते, मग तिने आत्महत्या का केली? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, रोशनीचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला, याचे खरे कारण शवविच्छेदनाचा अहवालसमोर आल्यानंतरच पुढे येईल. रोशनी पसरडे हिच्या आत्महत्या मागे नेमके काय कारण आहे, याचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Breaking News: Suicide of a minor girl who passed 10th standard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here