संगमनेर: पत्नीचा खून करून पतीने मारली नदीत उडी
Breaking News | Sangamner Crime: चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून करणाऱ्या पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न.
घारगाव: चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून करणाऱ्या पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील खंदारे वस्तीवर बुधवारी (दि.30 जुलै) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
चंद्रकला दगडू खंदारे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. दगडू लक्ष्मण खंदारे (वय 65) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे. कुऱ्हाडीचे वार डोक्यात, मानेवर खोलवर गेल्याने चंद्रकला यांचा जागीच मृत्यू झाला.
खंदारे कुटुंब टेकडीवरील घरात एकत्रित राहत असून वृध्द पती-पत्नी घराशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोपत. नेहमीप्रमाणे कुटुंबाने बुधवारी रात्री एकत्रित जेवण केले. जेवण करतेवेळी दगडू हे पत्नी चंद्रकला हिला शिवीगाळ करत होते. त्याला किंवा हिला एक दिवस मारून टाकणार असे ते बडबडत होते.
मुलाने त्यांना शांत करत झोपण्यासाठी जाण्याचे सांगितले. पती-पत्नी झोपण्यासाठी जात असताना दगडू यांनी दोरी हातात घेतली. त्यावेळी सकाळी धारा काढण्यासाठी लागेल असे मुलगा म्हणाल्याने त्यांनी ती तेथेच टाकून दिली. पती-पत्नी शेडमध्ये झोपण्यासाठी गेले.
दगडू यांनी पत्र्याच्या शेडला आतील बाजूने कुलूप लावले. त्यानंतर कुऱ्हाडीने पत्नी चंद्रकला यांच्या मानेवर, डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. पत्नीची हत्या केल्यानंतर तो आरोप संबंधित व्यक्तीवर जाईल, या हेतूने शेडच्या जाळीवरून उडी मारत ते नदीकाठी पोहचले. नदीच्या पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोहता येत असल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
नदीकाठावरून ते पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये आले. तेथे त्यांनी ओले कपडे बदलले. तेथून ते घारगाव पोलिस ठाण्यात गेले अन् पत्नीच्या खुनाची कबुली दिली. घारगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, प्रमोद गाडेकर, सुभाष. यांनी घटनास्थळी भेट दिली.
Breaking News: Husband kills wife and jumps into river