अहिल्यानगर: मॅगीच्या पॅकेटमध्ये मृत पाल आढळली
Breaking News | Ahilyanagar: प्रसिध्द खाद्यपदार्थ कंपनी नेस्ले इंडिया यांच्याकडून तयार करण्यात येणार्या मॅगीच्या पॅकेटमध्ये मृत पाल आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली.
अहिल्यानगर: प्रसिध्द खाद्यपदार्थ कंपनी नेस्ले इंडिया यांच्याकडून तयार करण्यात येणार्या मॅगीच्या पॅकेटमध्ये मृत पाल आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार येथील अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल करण्यात आली असून, संबंधित घटनेची चौकशी सुरू झाली आहे.
गांधीनगर, बोल्हेगाव येथील रहिवासी निलेश दादासाहेब दिघे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2 जुलै 2025 रोजी येथील डिमार्ट (पाईपलाईन रस्ता) येथून 500 ग्रॅम वजनाचे मॅगीचे दोन पॅकेट खरेदी केले होते. त्यापैकी एक पॅकेट त्यांनी 10 दिवसांपूर्वी वापरले. मात्र, 28 जुलै रोजी दुसरे पॅकेट उघडत असताना त्यात काळसर पदार्थ दिसल्याने त्यांनी संपूर्ण पॅकेट तपासले असता त्यामध्ये मृत पाल आढळून आली.
ही धक्कादायक बाब लक्षात घेतल्यानंतर त्यांनी सुरूवातीला संबंधीत उत्पादक कंपनीकडे तक्रार दाखल केली व 30 जुलै अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणावर अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या प्रकरणाची माहिती केंद्रीय परवाना अधिकार्यांना ईमेलव्दारे पाठवण्यात आली असून, संबंधित उत्पादनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, नेस्ले कंपनीच्या स्थानिक डिस्ट्रीब्युटरची देखील तपासणी केली जाणार आहे.
Breaking News: Dead snail found in Maggi packet