अहिल्यानगर: तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी गजाआड
Breaking News | Ahilyanagar: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला आळंदी येथे नेऊन तेथे तिला एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी गजाआड केले.
शेवगाव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला आळंदी येथे नेऊन तेथे तिला एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी गजाआड केले. आरोपी परराज्यात पळून जात असताना पोलिसांनी त्याला धुळे येथून ताब्यात घेतले.
अण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून दिनांक ८ जुलै रोजी आण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे आणि त्याचे नातेवाईक, प्रवीण प्रल्हाद आंधळे, जनाबाई प्रल्हाद आंधळे (वरील सर्व रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) व अनोळखी वाहन चालक यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींनी पीडित मुलीला २ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने वाहनात बसविले. यावेळी तिला जर आरडाओरडा केला, तर तुझ्या अंगावर अॅसिड टाकू, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर, तिला आरोपी आळंदी (ता. हवेली जि. पुणे) येथे घेऊन गेले. यावेळी इतर आरोपींनी पीडितेला आणि आण्णासाहेब आंधळे यास एका खोलीत ठेवले. यावेळी आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल होताच, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलिस पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केले होती. अखेर २७ जुलै रोजी त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक बाजीराव सानप, रामहरी खेडकर, पोलिस कर्मचारी भगवान सानप, श्याम गुंजाळ, संपत खेडकर, ईश्वर बेरड, राजू बढे, सचिन पिरगळ, तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डू यांनी केली आहे.
Breaking News: Accused of raping young woman arrested